यावल येथे बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा

यावल प्रतिनिधी । येथील एका धार्मिक संस्थेच्या मस्जिद विश्वसतांकडुन बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी यावल नगर परिषदचे मुख्याधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मजहर अली इफ्तेखार अली (बाबुजीपुरा,यावल) व ख्वाजा मस्जिद मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष शेख सैफुद्दीन शेख चांद यांनी शहरातील बाबुजीपुरा भागात सिटी सर्व्हे क्रमांक ३३६७ या जागेच्या बांधकामाबाबत दिलेल्या परवानगीनुसार संस्थेच्या विश्वसतांनी शर्ती व अटीचा भंग करुन पूर्वेकडील भिंत पाडून वापर पूर्वेकडे केला तसेच नगरपरीषदेची कोणतीही परवानगी न घेता व ना हरकत प्रमाणपत्र न घेता तेथे फ्रिज दुरुस्तीचे दुकान जनरेटर व गॅस वेल्डिंगचे साहित्य वापरुन बेकायदेशीर कृत्य केले. एवढेच नव्हे तर सदर बांधकाम बंद करण्याची पुर्व सूचना देवूनही ते थांबवले नाही म्हणून बुधवारी नगर परिषदचे मुख्यधिकारी तडवी यांनी ख्वाजा मस्जिद संस्थेतेच्या यांच्या विरूध्द महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायदा १९६६ चे कलम ५२ ( १) चे पोट कलम (अ),(ब) तसेच कलम ५४ ( २) प्रमाणे संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशा प्रकारे धार्मिक विश्वस्तांवर यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाल्याने शहरात समाजबांधवांमध्ये एकच चर्चेला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन चव्हाण करीत आहेत.

Protected Content