रावेर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून तालुक्यातील तांदलवाडी, खानापूर, केऱ्‍हाळे, ऐनपूर, विवरे खुर्द, रसलपूर यांसह ४८ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.यासाठी आज मतदान साहित्य देण्यात आल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी उषाराणी देवगुणे यांनी दिली

रावेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या १४५ प्रभागांत ४५२ जागांसाठी ७५९ उमेदवार रिंगणात आहेत, तर १३२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणुकीसाठी १६४ मतदान केंद्रे असतील. १६४ केंद्रप्रमुख, ४९२ मतदान अधिकारी, १६४ शिपाई अशा एकूण ८२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. तर ९० कर्मचारी राखीव ठेवले आहेत . मतदान सील करण्यात आली आहेत. आज तहसील कार्यालयात मतदानाचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी कार्यालयाच्या आवारात भव्य मंडप उभारला आहे. मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोचविण्यासाठी व आणण्यासाठी ३१ खासगी बस राहणार आहेत . तहसील कार्यालयामधून सकाळी मतदान यंत्रे व साहित्य घेऊन मतदान केंद्रप्रमुख, अधिकारी, कर्मचारी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले आहे.

Protected Content