Home Cities जळगाव पुणेच्या धर्तीवर जळगाव शहरात खाजगी क्लासेसला परवानगी द्या

पुणेच्या धर्तीवर जळगाव शहरात खाजगी क्लासेसला परवानगी द्या

0
42


जळगाव, प्रतिनिधी । खाजगी क्लासेस सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की, कोरोना महामारीत खाजगी शिकवणी वर्ग मागील ९ महिन्यापासून बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण तितकेसे फायदेशीर नाही. अनेक क्लास चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. पुणे म्ह्पालापालिका आयुक्तांनी नुकतीच पुणे शहरासाठी ‘कोविड-१९’ चे नियम पाळून खाजगी क्लासेस सुरु करण्याची परवानगी दिली आहे. याच धर्तीवर जळगाव शहरासाठी सुद्धा अशी परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्या आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, खाजगी क्लासेसचे अध्यक्ष व्यंकटेश आय्यंगार आदींच्या स्वाक्षरी आहेत.


Protected Content

Play sound