लाचखोरीत प्रांताधिकार्‍यांसोबत अजून एका बड्या अधिकार्‍याचा समावेश ?

जळगाव प्रतिनिधी । आज अँटी करप्शन ब्युरोने थेट प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता पडद्याआडच्या हालचाली गतीमान झाल्याचे दिसून येत आहे. यात अधिकार्‍यांना वाचविण्याची धडपड करण्यात येत असल्याची विश्‍वसनीय माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणाच्या मूळ तक्रारीत अजून एका अधिकार्‍याचा समावेश असल्याने त्यांचे नाव आरोपींच्या यादीत येणार का ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

आज वाळू वाहतुकदाराकडून आपल्या पंटरच्या मार्फत लाच स्वीकारण्याच्या आरोपातून जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला चौरे आणि लिपीक अतुल अरूण सानप यांच्या विरूध्द एसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे. यात पंटरसह लिपीकाला ताब्यात घेण्यात आले असले तरी प्रांताधिकार्‍यांची चौकशी अद्यापही करण्यात आलेली नाही. यातच आता या प्रकरणातील वेगळा पैलू समोर आला आहे.

या प्रकरणात अजून एका अधिकार्‍याचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे यात अजून कुणाचे नाव वाढणार का ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तथापि, विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात आता पडद्याआडच्या घडामोडी गतीमान झाल्या आहेत. यात बड्या अधिकार्‍याला वाचविण्यासाठी धडपड करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. यात राजकीय प्रभावाचा वापर देखील करण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराने अजून एका अधिकार्‍याचा आपल्या तक्रारीत उल्लेख केलेला आहे. यामुळे आता संबंधीत अधिकार्‍याचा आरोपींच्या यादीत समावेश होईल की नाही ? याबाबत आता उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.

Protected Content