यावल बाजार समितीच्या गोडावून अन धान्य प्रतवारी यंत्रणेचे भूमिपूजन

yaval news

यावल, प्रतिनिधी | यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोडाऊन तसेच धान्य चाळण प्रतवारी यंत्रणेच्या मंजुरीसाठी आवश्यक पाठपुरावा करून काम हाती घेतलेले आहे, त्या कामाबद्दल संचालक मंडळास शुभेच्छा देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न खऱ्या अर्थाने बाजार समितीने सोडवल्याबद्दल त्यांना आमदार हरिभाऊ जावळे यांनी शुभेच्छा दिल्या.यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या गोडावून व धान्य प्रतवारी जागेचे भूमिपूजन आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते आज (दि.७) करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 

याप्रसंगी प्रास्ताविकात उपसभापती राकेश फेगडे यांनी शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळावा, शेती उत्पादन साठवणूक करण्याची सुविधा निर्माण व्हावी, मालाची प्रतवारी चांगली राहावी, त्यामध्ये गुणात्मक सुधारणा व्हावी, यासाठी देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाने राष्ट्रीय विकास योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या हक्काच्या बाजार समित्या सक्षम करण्यासाठी या योजनेतून अर्थसहाय्यातून धान्य चाळण प्रतवारी यंत्रणा आणि एक हजार मेट्रिक टनाची गोदाम उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, असे सांगितले. ना. हरिभाऊ जावळे यांचा बाजार समितीच्या वतीने सभापती भानुदास चोपडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर सर्व संचालक मंडळ आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ नाशिक विभाग उपसरव्यवस्थापक बी.सी. देशमुख व एच.पी. अत्तरदे कनिष्ठ अभियंता नाशिक विभाग यांच्यासह यावल तालुका सहाय्यक उपनिबंधक एम.पी. देवरे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला जिप सदस्य सविता अतुल भालेराव, संचालक तुषार उर्फ मुन्ना पाटील, अतुल पाटील, माजी कृउबाचे सभापती नारायण चौधरी, पांडुरंग सराफ, उमेश पाटील, डॉ. नरेंद्र कोल्हे, पुंजो पाटील उमेश फेगडे, उमेश पाटील, विजयकुमार देवचंद पाटील, सौ कांचन फालक, सत्तार तडवी, अशोक शेठ चौधरी, सुनील बारी, यावल येथील माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, प्रगतशील शेतकरी प्रमोद शेठ नेमाडे, बाळू फेगडे, भाजपा सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैन सिंग राजपूत, भाजपाच्या फैजपूर येथील कार्यकर्त्या संगीता चौधरी, गोपालसिंग पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष खर्चे, माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, शरद कोळी, फळ विक्री सोसायटीचे चेअरमन नाना पाटील, तसेच तालुकाभरातून आलेले शेतकरी व व्यापारी तसेच विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव एस.बी. सोनवणे यांनी केले.

Protected Content