वाहन चोरांच्या टोळीला एक दिवसांची पोलीस कोठडी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील मोटरसायकल चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १३ जणांच्या टोळीला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या टोळक्याचा आंतरराज्य टोळीशी लागेबांधे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी यावलच्या पोलीस ठाण्यात मागील सप्टेंबर महीन्यात शहरातील कुंभारटेकडी परिसरातुन चोरीस गेलेल्या ट्रेक्टर चोरीच्या गुन्ह्याचा पोलीसांकड्डन शोध घेतले जात असतांना पोलीसांच्या हाती मोटरसायकल चोरी करणार्‍या चोरांची टोळीच हाती लागल्याने पोलीसांनी केलेल्या चोरट्यांवर कारवाईमुळे तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

या मोटरसायकल चोरी प्रकरणी पोलीस उपअधिक्षक डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी लावलेल्या मोटरसायकल चोरीच्या तपासात १३ मोटरसायकल्स जप्त केल्या असुन यात पोलिसांनी संशयीत आरोपी म्हणुन अर्जुन सुरेश कुंभार अशरफ उर्फ गोलु कलींदर तडवी, जावेद खान अशरफ खान,सागर उर्फ उमेश जितेन्द्र सपकाळे,देविदास उर्फ साहिल तलेश बारसे, विशाल दिलीप वाणी, विनोद दौलत कुंभार, उमेश झग्ग्रु घारू, संजय भगवान भोई, हर्षल सदांनद गजरे,रविन्द्र सुरेश कुंभार, आकाश राजु कुंभार, सुरेश आनंदा कुंभार,राजेश कडू महाजन ( सर्व राहणार यावल ) आणी रविन्द्र पंढरी कोळी राहणार दहिगाव तालुका यावल यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व संशयीत आरोपींना पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता न्या.एस बी. वाळके यांनी दिवसाची पोलीस कोठडीत ठेण्याचे आदेश दिले आहे.

या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात पोलीसांनी राज्यासह मध्यप्रदेश आणी गुजरात मोटरसायकल जप्त केल्या असुन या मोटरसायकल चोरीच्या वाहन प्रकरणात आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.

Protected Content