दुदैवी घटना : देवीची मुर्ती अंगावर पडल्याने तरूणाचा मृत्यू

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बऱ्हाणपूर येथून मुक्ताईनगर मार्गे देवीची मुर्ती आणतांना अपघात झाल्याने अंगावर देवीची मुर्ती पडल्याने जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणारा तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटनना मध्यरात्री बारावाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे मेहरूण परिसरात शोककळा पसरली आहे. संजय उर्फ जितू गोपाल कोळी (वय ३५ रा. जोशी वाडा, मेहरूण) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवी बसवण्यासाठी तयारी झालेली होती.  त्याकरिता देवीची मूर्ती बऱ्हाणपूर येथून आणण्यासाठी मंडळाचे काही कार्यकर्ते हे शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी गेलेले होते. तेथून परतत असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्याजवळ अपघात घडला.  या अपघातामध्ये देवीची मूर्ती जितू उर्फ संजय कोळी यांच्या अंगावर पडल्याने त्याच्याखाली दाबून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

त्याच्या मित्रांनी तात्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले.  तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. कुटुंबियांना फोनवर माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला.  दरम्यान मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  एमआयडीसी जळगाव येथील एका कंपनीमध्ये तो खिडक्यांच्या सेंटरिंगचे काम करीत होता.मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

 

Protected Content