मोबाईल चोरट्या अटक; एमआयडीसी पोलीसांची कामगिरी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुलीवरील एका हॉटेलवर गेलेल्या तरूणाचा मोबाईल लांबविणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे.

अधिक माहिती अशी की, विशाल अशोक सरोदे (वय-३०) रा. पिंपळगाव हे कामाच्या निमित्ताने २३ डिसेंबर रोजी हॉटेल काशिनाथ लॉजजवळ आले होते. हॉटेलच्या काऊंटर मोबाईल ठेवून चर्चा करत असतांना अज्ञात चोरट्याने ११ हजार रूपये किंमतीची मोबाईल लांबविला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, मुदस्सर काझी, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी अमोल सोपान ढोंगळे (वय-२८) रा. रामनगर मेहरूण याला अटक करून चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. आज न्यायालयात हजर केले असता न्या. एन.के.पाटील यांनी कारागृहात रवानगी केली आहे.

सदर मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील अतुल वंजारी गणेश शिरसाळे मुदस्सर काझी सचिन पाटील अशांनी आरोपी यास रामनगर येथून ताब्यात घेतले होते त्याच्याकडून त्याने त्वरित केलेला मोबाईल हा हस्तगत करण्यात आला असून त्यास आज रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे एन के पाटील मॅडम यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळून कारागृहात रवानगी केली आहे

Protected Content