सिध्देश्वर नगरात एकाची दुचाकी पेटविली

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगरात घरासमोर पार्कींगला लावलेली दुचाकीवर अज्ञात व्यक्तीने ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना सोमवारी १५ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे वरणगाव परिसरातील वाहनधरकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मंगळवारी १६ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगर भागात रहिवाशी असलेले शेख अकरम शेख अकील (वय-२८) यांनी त्यांच्या वडीलांच्या नावे नुकतीच घेतलेली हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी. 8251) ही घराच्या समोर पार्कींग करून लावलेली होती. ही दुचाकी घरासमोर लावली असताना सोमवारी १५ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अज्ञातांनी दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकुन पेटवून दिली.

आगीचा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरीकांनी धाव घेवून पेटलेल्या दुचाकीला विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आले. या आगीत दुचाकी जळून खाक झाली आहे. लागलेल्या आगीबाबत शेख अक्रम शेख अकील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास तपास सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागेंद्र तायडे करीत आहेत.

Protected Content