४ लाख रूपयांसाठी विवाहितेचा छळ; मुलीसह हाकलून काढले घराबाहेर

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भाटगल्ली येथील माहेर असलेल्या विवाहितेला कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ४ लाख रूपयांसाठी छळ करण्यात आला तर पैसे दिले नाही म्हणून मुलीसह विवाहितेला घरातून हाकलून दिले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात पती व सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, “चोपडा शहरातील भाटगल्लीतील माहेर असलेल्या विवाहिता सोनाली चिराग ब्रम्हभट्ट (वय-२७) यांचा विवाह चिराग प्रविण ब्रम्हभट्ट रा. परीएज ता.मातर जि.खेडा, गुजरात यांच्याशी २४ मे २०१४ मध्ये रितीरिवाजानुसार विवाह झाला. लग्नानंतर विवाहितेचे पती चिराग हा कोणताही कामधंदा करत नव्हता यामुळे विवाहितेने कामधंदा करण्यास सांगितले. याचा राग असल्याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर विवाहितेचे पती आणि सासरे यांनी काढलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ४ लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. दरम्यान पैसे दिले नाही म्हणून विवाहितेला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली व विवाहितेसह मुलगीला घराबाहेर काढून हाकलून दिले.

या छळाला कंटाळून विवाहिता चोपडा येथे माहेरी निघून आल्यात. मंगळवार, दि. १७ मे रोजी विवाहितेन चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात चिराग प्रविण ब्रम्हभट्ट आणि सासरे प्रविण नानुभाई ब्रम्हभट्ट दोन्ही राहणार परीएज ता.मातर जि.खेडा, गुजरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वासूदेव सपकाळ करीत आहे.

Protected Content