आयुक्तांचा दणका – प्रभारी मुकादमासह ३ सफाई कामगारांचे निलंबन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी आपल्या कडक शिस्तीचा बडगा दाखवत आज सकाळी ६ वाजता आरोग्य विभागात हजेरी लावत प्रभारी मुकादमासह ३ सफाई कामगारांच्या निलंबनाचे आदेश काढले असून या प्रकरणी आरोग्य निरीक्षक नंदू मधुकर साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस प्रशासनाकडून काढण्यात आलेली आहे.

डॉ.विद्या गायकवाड यांनी आज आज बुधवार, दि.१८ मे रोजी सकाळी ६ वाजता आरोग्य विभागाच्या वार्ड क्रमांक ९ येथील कार्यालयाचे हजेरी पत्रकाची तपासणी केली. त्या ठिकाणी बऱ्याच कर्मचारी वर्गाची हजेरी पत्रकावर गैरहजर असल्याच्या नोंदी आढळून आले; तसेच कमी मजूर असताना जास्त हजेरी नोंदवण्यात आल्याचेही दिसून आले. त्यामुळे तेथील प्रभारी मुकादम सलमान शेख सलीम भिस्ती सफाई कामगार यांना आज रोजी प्रशासनाने निलंबन आदेश काढले आहेत.

तसेच आरोग्य विभाग वार्ड क्र. २ येथील कार्यालयाचे हजेरी पत्रकाची सुद्धा आयुक्त महोदयांनी तपासणी केली. तेव्हा तेथील ३ सफाई कामगार अनिल किसन बेडवाल, कन्हैया राजेंद्र चव्हाण आणि अनिता अनिल डाबोरे हे कोणतीही पूर्वसूचना न देता अनाधिकृत या कामावर गैरहजर आढळून आल्याने त्यांनासुद्धा प्रशासनाकडून निलंबनाचे आदेश काढलेले आहेत.

तसेच या प्रकरणी आरोग्य विभाग वार्ड क्रमांक ९ चे आरोग्य निरीक्षक नंदू मधुकर साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस प्रशासनाकडून काढण्यात आलेली आहे.

Protected Content