यावल येथे मनसेच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा (व्हिडिओ)

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांकडून कवि श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ हा मराठी पत्रकार व शिक्षकांचा सत्कार करण्यात येवून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

रविवार, दि.२७ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज विष्णु शिरवाडकर यांना जन्मदिवस अर्थातच ‘मराठी भाषा गौरव दिन’ निमित्त मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणारे मराठी शिक्षक व शिक्षिका आणि पत्रकार यांचा सत्कार करत गौरव करण्यात आला.

या ठिकाणी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुधा खराटे यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामन शिरवाङकर यांच्याव्दारे लिखित ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह भेट देऊन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी साने गुरुजी शाळेचे मराठी शिक्षक योगेश बारी व सरस्वती विद्या मंदिर शाळेचे शिक्षक किरण वाणी यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

यासह अनेक वर्षांपासून मराठी पत्रकारिता करीत असलेल्या तालुक्यातील मराठी पत्रकार राजु कवडीवाले, डी बी पाटील, अय्युब पटेल, शेखर पटेल, सुनिल गावडे, प्रकाश चौधरी, ज्ञानदेव मराठे, भरत कोळी, पराग सराफ़, तेजस यावलकर, दिपक नेवे, काबीज शेख यांच्यासह इतर मान्यवरांचा देखील या वेळी सत्कार करण्यात आला. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, तालुका उपाध्यक्ष अनिल सपकाळे, शहर अध्यक्ष किशोर नन्नवरे, शहर उपाध्यक्ष अबिद कच्छी, गौरव कोळी, मनोज महेश्री, राहुल पाटील, गजेंद्र माळी, अजय तायडे, कुणाल बारी, पंकज हटकर, हेमराज चौधरी, गजमल भिल, राजू शेख आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार चेतन अढळकर यांनी मानले.

व्हिडीओ लिंक :
https://fb.watch/br3iHXPXe9/

Protected Content