मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आढावा बैठक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जळगाव येथील सभेच्या आणि माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसा निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्या जाहिर सभेचे येत्या ५ सप्टेंबर रोजी सागरपार्क जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या नियोजनासाठी तसेच माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्या 2 सप्टेंबर रोजी असलेल्या वाढदिवसा निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरची विस्तृत बैठक आज मुक्ताईनगर येथे पार पडली.

यावेळी बैठकीस राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या रोहिणी ताई खडसे यांनी मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खा.शरद पवार यांची 5 सप्टेंबर रोजी जळगाव येथे जाहिर सभा होणार आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समता व संविधानाच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळात ७० हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली. महिलांना आरक्षण दिले त्यांनी कृषि संदर्भात अनेक योजना आणल्या. महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम पवार साहेबांच्या नेतृत्वात झाले परंतु तत्कालीन सत्ताधारी हे  स्वत:चं अपयश लपवण्यासाठी पवार साहेबांनी काहीच केलं नाही असं दर्शवण्याचा खोटारडेपणा करत आहेत.

आपले काही सहकारी या काळात पवार साहेबांना सोडुन गेले म्हणून हि वेळ आपला स्वाभिमान असलेल्या पवार साहेबांना साथ देण्याची आहे. म्हणूनच जळगाव येथील शरद पवार यांची सभा न भुतो न भविष्यती अशी आपणा सर्वांना यशस्वी करायची आहे त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन करावे. तसेच आ. एकनाथ खडसे यांचा वाढदिवस विविध जनहिताचे लोकोपयोगी कार्यक्रमराबवून साजरा करावा, असे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना रोहिणी खडसे यांनी आवाहन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, येत्या 5 सप्टेंबर रोजी सागर पार्क मैदान जळगाव येथे शरद पवार साहेबांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येवला, बिड, कोल्हापूर नंतर जळगाव येथे शरद पवार साहेबांची सभा पार पडणार आहे या सभेला चाळीस हजार नागरिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत हि सभा यशस्वी करण्यासाठी आपणा सर्व पदाधिकऱ्यांना मेहनत घ्यायची आहे सर्वांना सभेचे निरोप देऊन सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटल जिल्हा समन्वयक विकास पवार ,प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील ,प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेल उमेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश पाटील  , प्रदेश समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेल रिटा बाविस्कर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेल इब्राहिम तडवी, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,राष्ट्रवादी काँग्रेस मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील, बाजार समिती सभापती सुधीर तराळ, माजी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील माजी पं.स. सभापती दशरथभाऊ  कांडेलकर विलासभाऊ धायडे, राजु माळी, डॉ बि सी महाजन , आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

Protected Content