शिवालय मंदिराचा भूमीपूजन सोहळा !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील रामवाडी परिसर पाण्याच्या टाकीजवळ ओपन प्लेस च्या जागेवर भव्य दिव्य शिवालय मंदिराचे भूमिपूजन परमपूज्य संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.

मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 51 फूट उंच व 21 खांब असलेले प्रशस्त सभा मंडप तसेच परिसरातील कंपाउंड व बाल उद्यान करण्याचे सूर्यमुखी सेवा समितीने ठरविले यावेळी प्रसाद महाराज यांचे स्वागत परिसरातील प्रा.एस बी सोनार यांच्या हस्ते महाराजांचे स्वागत झाले मंदिरासाठी पिंड व मुर्त्या अमळनेरातील कुसुमाई फर्निचर उद्योग समूह चे संचालक श्री दादा पवार यांनी देण्याचे कबूल केले त्यांच्या सत्कार व आशीर्वाद प्रसाद महाराजांनी यांनी दिला तसेच भजन संध्या च्या कार्यक्रम झाला.

यात मंगळग्रह मंदिरातील प्रमुख पुजारी श्री प्रसाद भंडारी महाराज यांनी भजन म्हटले, मोहिनी बँड पथक यांनी संगीत व श्री शशांक संदानशिव, भैय्या वानखडे, अशोक गरुड, अविनाश गुरव, महेंद्र कांबळे यांच्यासह संगीतसह भजन म्हटले. मंदिरासाठी प्रसाद महाराज हे मुकुट देणार आहे, शिवाय परिसरातील लोकांनी मंदिरासाठी देणग्या दिल्यात असून भव्य व दिव्य मंदिराचा बांधकामासाठी कार्यक्रमाच्या वेळेस देण्यात आले. याप्रसंगी सूर्यमुखी सेवा समितीसह कार्यकर्ते व रामवाडी ,केशवनगर ,आयोध्या नगर ,बंगाली फाईल, समता कॉलनी, आयडीपी कॉलनी, तांबेपुरा, गायत्री कॉलनी या परिसरातील लोकांनी उपस्थित होते.

 

Protected Content