आचारसंहिता भंगाविषयीच्या तक्रारी नोंदविण्यासाठी सी-व्हिजिल उपलब्ध

Untitled 16 9

 

जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणूका पारदर्शक व मुक्त वातावरणात होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. विधानसभा निवडणूकी दरम्यान कुठे आचारसंहितेचा भंग होत असल्यास ही बाब निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास आणून देता यावी, तसेच नागरिकांना आचारसंहितेबाबत त्यांची असणारी तक्रारी नोंदविता यावी. यासाठी सी-व्हिजिल (C-vigil) ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांची आचारसंहितेबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी ती सी-व्हिजिल ॲपवर नोंदवावी त्याची तातडीने दखल घेतील जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जनतेला आचारसंहिता भंग विषयक तक्रारी करावयाची असल्यास त्यांनी सी- व्हिजिल ॲपवर कराव्यात. याकरिता नागरिकांना प्रथम आपल्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरमधून अथवा ॲपल ॲप स्टोअरमधून सी- व्हिजिल ॲप डाऊनलोड करुन घ्यावे लागेल. या ॲपवर आचारसंहिता भंग होत असल्याच्या घटनेचा लाईव्ह फोटो/ व्हिडीओ टाकून घटनेबाबतची सविस्तर माहिती द्यावी लागेल.  तरी जनतेने विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेबाबत आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी सी- व्हिजिल ॲपचा वापर करावा. असे जिल्हा संपर्क अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content