चाळीसगावच्या शेतकी संघाची निवडणूक बिनविरोध ! : भाजपचा झाला प्रवेश

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने चाळीसगाव शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध झाली असून यंदा पहिल्यांदाच भाजपचे सहा सदस्य या संस्थेत दाखल झाले आहेत.

चाळीसगाव  शेतकरी सहकारी संघ पंचवार्षिक निवडणूक आज दि.२० रोजी उमेदवारी अर्ज माघारीच्या आज शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडून अखेर निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यात भाजपचे ६ तर विरोधकांचे ९ संचालक शेतकी संघावर बिनविरोध निवडले गेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी  राष्ट्रवादी प्रणीत शहर विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत देशमुख व कॉंग्रेसतर्फे माजी आमदार ईश्वर जाधव यांना सोबत घेत ही निवडणूक बिनविरोध केली. २०१६ मध्ये राष्ट्रवादी कडून झालेल्या दगाफटक्याचा वचपा काढला.

दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात करण्यात आला. यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी,  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, संजयतात्या पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम. शहराध्यक्ष नितीन पाटील, विधानसभा निवडणूक प्रमुख घृष्णेश्वर पाटील, कृउबा  सभापती कपिल पाटील, विवेक चौधरी, विजय पाटील, उदेसिंग मोहन पाटील आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाचे बिनविरोध संचालक खालीलप्रमाणे..!

सर्वसाधारण मतदारसंघ

१) प्रशांत रामराव देशमुख (चाळीसगाव)

२) अविनाश जगन्नाथ चौधरी (खेडगाव)

३) किशोर माधवराव पाटील (तमगव्हाण)

४) विजय झामसिंग जाधव (घोडेगाव)

अनुसूचित जाती/जमाती

५) ईश्वर रामचंद्र जाधव (चाळीसगाव)

महिला राखीव

६) मेघा प्रशांत पाटील (उंबरखेड )

Protected Content