पाचोरा येथे शिवसेना कार्यकर्ते अन मुस्लिम युवकांचा रा.काँ.त प्रवेश

ncp pachora

पाचोरा, प्रतिनिधी | येथील कुर्बान नगर भागातील असंख्य मुस्लिम समाजातील युवकांनी नुकताच दिलीप वाघ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी अजहर खान व पक्षाचे बरेच पदाधिकारी उपस्थित होते.

 

याशिवाय शहरातील भाजीपाला मार्केट कमिटीचे सदस्य व कृष्णापुरी भागातील शिवसेनेचे कार्यकर्ते राजु बडगुजर, भाजीपाला मार्केट कमिटीचे पप्पू पाटील, हरी जगताप व अन्य काही सदस्यांनी संजय वाघ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश  केला. या सगळ्यांचे पक्षातर्फे स्वागत करण्यात आले.

Protected Content