ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुली येथे ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, नेहरूनगर येथील रहिवासी आत्माराम जयराम सपकाळे वय ५५ याचे अजिंठा चौक परिसरात वर्कशॉप आहे. ३१ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आत्माराम सपकाळे हे त्यांच्या एम.एच.१९ डी.एल.२००३ या क्रमांकाच्या दुचाकीने वर्कशॉपवर जात होते. अजिंठा चौफुलीवर आर.जे.१९ जी.डी. २१९९  या क्रमांकाच्या ट्रकने सपकाळे यांच्या दुचाकीस मागून धडक दिली. या अपघातात सपकाळे यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी जखमी आत्माराम सपकाळे यांच्या जबाबावर  ट्रकचालक हुकमाराम देवराम चौधरी  रा. होडू ता.गुडामालानी जिल्हा बाडमेर,  राजस्थान याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलिस नाईक सुनिल सोनार हे करीत आहेत.

 

Protected Content