जळगावात महिलेचा ९२ हजारांत फसवणूक; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील भगीरथ कॉलनी येथील महिलेची ९२ हजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, भगीरथ कॉलनीतील रहिवासी शीतल राजेश काबरा  वय ४२ या जळगाव शहरातील नवाल हॉस्पिटल येथे मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत.  बुधवार २ फेब्रुवारी रोजी शीतल काबरा या घरी असताना त्यांच्या घरी रजिस्टर पोस्टाने एक बंद पाकिट आले. पाकीट उडत बघितले असता त्यात एक नापतोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पत्र क्रॅश कूपन कार्ड होते. कूपन कार्ड क्रॅश केले असता त्यात इंग्रजीत तुम्ही साडे सहा लाख जिंकले असुन ते मिळवण्यासाठी १९ RuB असा एसएमएस कोड लिहलेला होता. क्रॅश कार्डनुसार रक्कम मिळण्यासाठी शीतल काबरा यांनी पत्रावरील हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधला .  हेल्पलाइन नंबर बोलणार्या संबंधितांनी फोन करून वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स सांगून  शीतल काबरा यांनी गूगल पे ने रक्कम पाठविण्यास सांगितले. अशाप्रकारे शितल काबरा यांनी एकूण  ९२ हजार रुपये पाठवले. मात्र क्रॅश कार्डनुसार कुठलेही रक्कम मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर शितल काबरा यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जयंत कुमावत हे करीत आहेत.

Protected Content