किनगावात भावांच्या भांडणात हटकल्याचा रागातून तरूणाला फायटरने मारहाण

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किनगाव येथे दोन्ही भावांच्या भांडणात बोलल्याचे हटकल्याचा रागातून दोन जणांनी तरूणाला फायटरने मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात यावल पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, “गोरख भगवान साळुंखे (वय-३५) रा. धम्मनगर किनगाव ता. यावल हा तरूण आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गोरख व त्याचा चुलत भाऊ अभय साळुंखे यांचे दोघांचे गुरुवार, दि.२४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरगुती कारणावरून वाद सुरू होता. त्यावेळी त्यांच्या गावातील आमीन कालू तडवी आणि डेबा तडवी या दोघांनी जवळ येवून वादात पडले. यात गोरख साळुंखे म्हणाला की, ‘आमचा घरगुती वाद आहे. आम्ही आमचे निपटून घेवू” असा बोलला. याचा राग आल्याने आमीन तडवी आणि डेबा तडवी या दोघांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकाने लोखंडी फायटर काढून गंभीर दुखापत केली.

याप्रकरणी शनिवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री गोरख साळुंखे याने यावल पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आमीन तडवी आणि डेबा तडवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.

Protected Content