डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळा उत्साहात

जळगाव – परदेशी अभ्यासक्रमाच्या धर्तीवर वैद्यकीय अभ्यासक्रम कसा असावा आणि तो कसा शिकवावा यासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तज्ञ डॉक्टर्स, प्रोफेसर यांनी मार्गदर्शन केले.

नॅशनल मेडिकल कमिशनने फॉरेन एजुकेशन च्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमातील बदल कोणते आणि अद्यापन कसे करावे या उद्देशाने डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज मधील डीन डॉ.आर्वीकर हॉल मध्ये २९ व ३० डिसेंबर रोजी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 

कार्यशाळेचे उदघाटन डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज चे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आले.  कार्यशाळेत महाविद्यालयाचे  अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्वीकर, डॉ.सुयोग् चोपडे, शासकीय महाविद्यालयाचे डॉ.विलास मालकर, डॉ.माया आर्वीकर, डॉ.अमृत महाजन, डॉ.कैलास वाघ, डॉ.राहुल भावसार, डॉ.देवेंद्र चौधरी, डॉ.ढेकळे, श्री व सौ डॉ.राठोड, डॉ.वैशाली नागोसे , डॉ.ढाकणे  आदींनी मार्गदर्शन केले. डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयातील ३० डॉक्टर्स प्राद्यापकांनी कार्यशाळॆत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 

Protected Content