Home Cities धरणगाव धरणगावात अँग्लो उर्दू प्राथमिक शाळेचे उद्घाटन

धरणगावात अँग्लो उर्दू प्राथमिक शाळेचे उद्घाटन

0
100

dharangaon 2

 

धरणगाव प्रतिनिधी । येथील अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकतेचे अँग्लो उर्दू प्राथमिक शाळेचे उद्घाटन प्रा.दिलीप पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ना.गुलाबराव पाटील (सहकार राज्यमंत्री) यांनी भुषविले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप पाटील (management council member).(K B. C. N. M. U. Jalgaon) गुलाबराव वाघ (शिवसेना जिल्हा प्रमुख जळगाव) व सर्व नगरसेवक नगरपालिका धरणगाव नागरिक उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष- हाजी शफी अहमद काझी, चेअरमन-हाजी एहसान हुसेन साकी, सभासद अकील अहमद काझी, अलीम इंजिनियर शिरपूरकर, गुलाम ख्वाँजा मोमीन युसूफ भाई साकी, अकबर खान तसेच नवनियुक्त सभासद तौसिफ पटेल उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख शकीलुद्दीन तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पठाण वसीम यांनी केले.


Protected Content

Play sound