बोरखेडा हत्याकांडातील गुन्हेगारांना कठोर शिक्षेची मागणी; टायगर ग्रुपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे झालेल्या हत्याकांड प्रकरणातील गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी आणि पिडीतांना न्याय मिळावा यासाठी शहरातील टायगर गृपतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून चारही भावंडांचा अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हा खटला जलद न्यायालयात चालवून गुन्ह्यातील अटक केलेल्या गुन्हेगारांना शासनाने कडक शिक्षा व्हावी आणि पिडीत मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर यावेळी जळगाव जिल्हा टायगर ग्रुप सदस्य गौरव उमप, मनोज बाविस्कर, प्रणव शर्मा, कुणाल बारी, राहुल उमप, विवेक नेतलेकर, बाळा निंबाळकर, भरत लोंढे, जितेंद्र निंबाळकर यांची उपस्थिती होते.

 

https://www.facebook.com/watch/?v=706682459934823

Protected Content