केळी नुकसानीचे पंचनामे पुर्ण

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसाने शेतक-यांचे केळीचे सुमारे ५२ कोटीचे नुकसान झाल्याची माहिती आज प्रशासनातर्फे देण्यात आले. तसेच पंचनामे देखील पूर्ण करण्यात आले आहे.

पंचमाने करण्यात ढिलाई होत असल्याच्या लाईव्हच्या वृत्त नंतर अखेर आज आठव्या दिवशी प्रशासनाने पंचमाने करण्याचे काम पूर्ण केले आहे. यात रावेर तालुक्यात आलेल्या वादळी पावसामुळे सुमारे ५२ कोटी रूपयांचे केळीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहीती असून याची माहिती आज तालुका कृषि विभागा तर्फे देण्यात आली.

1) २५ मे रोजी आलेल्या वादळी पावसात  तिन गावां मधील ४६ शेतक-यांचे १८ हेक्टर वर केळीच्या बागाचे ७२ लाख ७६ हजाराचे नुकसान 

2) २७ मे रोजी आलेल्या वादळी पावसात २३ गावां मधील १ हजार ६११ शेतक-यांची ११६४ हेक्टर वरील केळीच्या बागाचे ४६ कोटी ५६ लाख ८८ हजार नुकसान 

3) २९ मे रोजी आलेल्या वादळी पावसात तेरा गावां मधील ११४ शेतक-यांचे ६५ हेक्टर वरील केळीचे २ कोटी ६३ लाख १२ हजार नुकसान 

4) ३० मे रोजी आलेल्या वादळी पावसात पाच गावां मधील ८४ शेतक-यांचे ३६  हेक्टर वरील १ कोटी ४३ लाख १२ हजाराचे नुकसान 

 

 

Protected Content