बसमध्ये चढतांना खिश्यातून २० हजारांची चोरी

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बसमध्ये चढत असतांना अज्ञात व्यक्तीने खिश्यातील २० हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भैय्यासाहेब विजय पाटील (वय-३४) रा. शिवकॉलनी, चोपडा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मेडीकल दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी ३१ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते चोपडा धरणगाव मार्गे जाणारी बस क्रमांक (एमएच २० बीएल १४०७) ने चढत असतांना त्यांच्या पॅटच्या खिश्यात ठेवलेले २० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना घडल्यानंतर त्यांनी पुर्ण बस तपासून पाहिली. परंतू पैशांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दुपारी ३ वाजता त्यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र साळुंखे करीत आहे.

Protected Content