मालवाहू चारचाकी वाहनाची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते आसोदा रोडवर असलेल्या मुंजोबा मंदीराजवळून एकाची मालवाहू चारचाकी वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलींद शशिकांत दलाल (वय-३६) रा. चौघुले प्लॉट, जुना ममुराबाद रोड, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. टेंट हाऊसचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांच्याकडे सामान वाहतूक करण्यासाठी (एमएच ०४ जीएफ ९०१२) क्रमांकाचे चारचाकी वाहन आहे. २७ जुलै रात्री ११ वाजता ते २९ जुलै सकाळी ९ वाजेच्या दरम्यान जळगाव-आसोदा रोडवरील मुंजोबार मंदीराजवळ चारचाकी वाहन पार्कींग करून लावले होते. अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहन चोरून नेल्याचे समोर आले. मिलींद दलाल यांनी वाहनाचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content