तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निमखेडी शिवारातील विटभट्टी जवळून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सोमवारी ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेंद्र सुरेश भोसले (वय-२९) रा. रत्न पिंप्री ता. पारोळा जि.जळगाव हा तरूण २४ जुलै रोजी सकाळी १० वाजता कामाच्या निमित्ताने धरणगाव तालुक्यातील निमखेडी येथे दुचाकी (एमएच १९ डीटी ६३३९) ने आलेला होता. त्यावेळी त्याने निमखेडी शिवारातील वीटभट्टी जवळ दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कोळी करीत आहे.

Protected Content