जळगावात लसीचे नियोजन कोलमडले; महापौरांची केंद्रावर धाव (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । सिंधी कॉलनी परिसरातील महापालिकेचे चेतनदास मेहता रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर नागरीकांनी आज पहाटे तीन वाजेपासून रांगा लावल्या होत्या. सकाळी ९ वाजेच्या सुमारास नागरीकांनी लसीकरण केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता. यावरून जळगावात लसीचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येत होते. याची माहिती महापौर जयश्री महाजन यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने भेट घेत नागारीकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले.

महापालिका प्रशासनाचा लसीकरणसंदर्भातील ढिसाळ कारभार आज पुन्हा उघड झाला आहे.  पहाटे तीन वाजेपासून चेतनदास मेहता रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केलेलं व इतरांनी  रांगा लावल्या. पहाटे तीन वाजेपासून सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर नागरिकांनी रांगा लावल्या परंतु सकाळचे ९  वाजले तरी त्यांना टोकन मिळत नसल्याची तक्रार हे नागरिक करत होते. त्यांनी लसीकरण केंद्राबाहेर रांग लावून गर्दी केली होता. केवळ ९० नागरिकांना कुपनचे वाटप करण्यात आले होते. मात्र, आमचे देखील लसीकरण करा असे म्हणत जमावाने लसीकरण केंद्राचे गेट तोडून केंद्रात प्रवेश केल्याने गोंधळ उडाला होता. ‘आम्ही केंदावर आलो असल्याने आम्हाला प्राधान्य द्या’ अशी मागणी हे नागरिक करीत होते. केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. या गोंधळाची माहिती मिळताच महापौर जयश्री सुनील महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या लसीकरण केंद्रावर जाऊन नागरिकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सहकार्य करा असे आवाहन करत  प्रत्येकाला लस मिळणार असल्याची ग्वाही महापौर जयश्री सुनील महाजन यांनी नागरिकांना दिली. मात्र लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांनी कुपन दिलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यास सुरूवात केली. अवघ्या एका तासानंतर हा गोंधळ कमी झाला होता.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/960223898061691

 

Protected Content