भालोद येथे रिकाम्या घराला लागली आग

यावल प्रतिनिधी । रिकाम्या घराला आग लागल्याने शेती उत्पन्नासह शेती साहित्य जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील भालोद येथे घडली आहे.

तालुक्यातील भालोद येथील भजे गल्लीत  डिगंबर वामन लोखंडे यांच्या फळीताल रहिवास नसलेल्या घराला रात्री दहा वाजून १५ मिनिटांनी अचानक आग लागल्याने शेतीमालासह काही शेती साहित्याचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच ग्रामपंचायतीने आगीचा सायरन वाजवल्याने ग्रामस्थांनी या आग लागलेल्या ठीकाणी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यासाठी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी भक्कम मदत झाली, सर्व तरुण मंडळी सह ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणल्याने लगतच्या रहिवासी घराना आगीपासून बचाव झाला.

यामध्ये चार क्विंटल दुराई १oo कट्टे दहा खाली पोते उडीद शेंगा मुगाच्या शेंगा सायकल लाकडी जिना समोरील लाकडी ग्रील पाण्याच्या खाली कॅन तुरीच्या शेंगा अशा शेती उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही मात्र हे सर्व नुकसान तुकाराम अमृत लोखंडे यांच्या काव्यात घर असल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. आगीचा सायरन वाजतात ग्रामस्थांनी दाखवलेली दक्षता घेतल्याने व तसेच मधुकर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब त्वरित दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

Protected Content