राजकमल टॉकीज परिसरातील अतिक्रमण काढले (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजकमल टॉकीज परिसरातील दुकानदारांनी दुकानासमोर ओटो काढून अतिक्रमण केले होते. आज मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिक्षक इस्माईख शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत जेसीबीच्या मदतीने सर्व ओटो काढण्यात आले.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील राजकमल टॉकीज परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून दुकानादारांनी त्यांच्या दुकानासमोर विनापरवानगी चार ते पाच फुट पुढे येवून अतिक्रमण करून विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यात दुकानांच्या समोर हातगाडी फळविक्रेते देखील गाड्या लावत होते त्यामुळे या रस्त्यावरून वाहन काढणे कठीण होत होते. वेळप्रसंगी याठिकाणी वाहतूकीची कोंडी देखील होते. गेल्या अनेक महिन्यांपासून दुकानदारांना महापालिकेने अतिक्रमण काढण्या बाबत सुचना आणि नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. परंतू दुकानदारांनी अतिक्रमित केलेले दुकाने व ओटे काढले नाही. त्यामुळे आज मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी महापालिकेचे अधिक्षक इस्माईल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण केलेले ओटे काढण्यात आले.

दरम्यान, मनपाचे उपायुक्त संतोष वाहुळे यांची बदली झाली असली तरी मनपाचा अतिक्रमण विभाग जोमाने काम करीत आहे. मंगळवारी सकाळीच राजकमल टॉकीज चौकात धडक कारवाई करीत अतिक्रमित ओट्यांवरून मनपाने जेसीबी फिरवला तसेच रस्त्यावर ठेवलेल्या खाट, पाण्याच्या टाक्या, लोखंडी शिडी असे साहित्य जप्त केले. अतिक्रमण विभागाचे प्रमुख इस्माईल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, नाना कोळी, किशोर सोनवणे, अनिल सोनवणे, मनोज तांबट, सलमान भिस्ती, भानुदास ठाकरे, नितीन भालेराव, साहेबराव कोळी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/917804719093571

 

Protected Content