Home Cities अमळनेर शहीद दिनानिमित्त अमळनेरात स्वच्छता मोहिम

शहीद दिनानिमित्त अमळनेरात स्वच्छता मोहिम

0
37

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) वतीने शहिद दिनानिमित्त अमळनेरातील हुतात्मा स्मारक येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

भाजयुमो प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. महान क्रांतिकारक, भारत मातेचे तरुण सुपुत्र शहीद भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्च 1931 रोजी क्रूर,जुलमी,हुकूमशाही ब्रिटीश सरकारने फाशी दिली होती. म्हणून हा दिवस देशात दरवर्षी शहीद दिवस म्हणून साजरा करतो. यानिमित्ताने भाजप युवा मोर्चा तर्फे अमळनेर शहरातील सर्व हुतात्मा स्मारक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याशिवाय भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेचेही पूजन करुन अभिवादन केले. या प्रसंगी भैरवी वाघ यांचेसह कृ.बा.समितीचे माजी सभापती प्रफुल्ल पवार, युवा मोर्चा अध्यक्ष योगीराज चव्हाण, सरचिटणीस राहुल चौधरी, समाधान पाटील, भटक्या विमुक्त जाती शहराध्यक्ष रवि ठाकूर, कल्पेश पाटील, सौरभ पाटील, जगदीश पाटील, आसिफ पिजारी, निखिल पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound