हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणीस प्रारंभ

रावेर प्रतिनिधी । तालुक्यात हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणीस प्रारंभ करण्यात आलेला आहे.

रावेर तालुक्यातील १०६२ शेतकर्‍यांनी हरभरा खरेदी साठी नाव नोंदणी केली आहे. हरभर्‍याचा पेरा तालुक्यात जास्त असल्याने या नोंदणीस प्रतिसाद मिळाला आहे. तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघा तर्फे हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणी सुरु असून तालुक्यातील शेतकर्‍यांनी नाव नोंदणी करावे यासाठी ७ / १२ उतारा,हरभरा या पिकाचा ऑनलाईन पिक पेरा नोंद असलेला उतारा. तलाठी यांच्या स्वाक्षरीचा ७ / १२ ग्राह्य धरण्यात येणार आहे. हस्तलिखित पिकपेरा असलेला ७/१२ स्विकारला जाणार नाही आधार कार्डची झेरॉक्स , बँक पासबुकची झेरॉक्स आधारलिंक असलेले ,स्वत : चा मोबाईल क्रमांक ऑनलाइन नोंदणी करतांना लागणार आहे. दरम्यान, शासनाने ४ हजार ८७५ रुपये भाव निश्‍चित केला असून शेतकर्‍यांची नावे अजून वाढणार असल्याची माहिती ग्रेडर प्रशांत पाटील यांनी दिली.

Protected Content