शेतकऱ्यांना अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन करावे : जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

0929012c def8 457b b2d1 74a93d876620

 

जळगाव (प्रतिनिधी) निसर्गाचा लहरीपणा, पाणी टंचाई, दुष्काळ या कारणांमुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याबरोबरच त्यांना कणखर बनविण्यसाठी आवश्यक ते मार्गदर्शन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.

 

ममुराबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पातंर्गत शेतीशाळा प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्धाटन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. हेमंत बाहेती, प्रकल्प विशेषज्ञ संजय पवार यांच्यासह शास्त्रज्ञ व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस निसर्गात बदल होत आहे. होणार बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे. परंतु अनेकवेळा इतरांचे अवलोकन करुनच शेती करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शेतीशाळा प्रशिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच शेतकऱ्यांना निसर्गातील बदलांची माहिती देऊन शेती करण्यास परावृत्त करावे. जिल्ह्यात पोकरातंर्गत 460 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. जेणेकरुन या गावांमध्ये बदल होण्यास मदत होईल. शासनामार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदान देण्यात येते, तसेच आपत्तीच्यावेळी शासनामार्फत मिळणारी मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारलिंक केलेले नसल्यामुळे असे शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहत आहे. शेतीशाळा प्रशिक्षकांनी अशा शेतकऱ्यांचे बँकखाते आधारलिंक करुन देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर म्हणाले की, पोकरा प्रकल्पातील शेतीशाळा हा अतिशय महत्वाचा घटक आहे. जिल्ह्यातील 460 गावांमध्ये 650 शेतीशाळा घेण्याचे नियोजन आहे. यासाठी प्रशिक्षक तयार करण्यात येत असून आजच्या प्रशिक्षणात 46 प्रशिणार्थीचा समावेश आहे. हे प्रशिक्षण 4 ते 8 जून या कालावधीत होणार आहे. हे प्रशिक्षणार्थी प्रत्येकी 7 गावांमध्ये जाऊन शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Add Comment

Protected Content