अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलीसांचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बी.जे.मार्केट परिसरात अनोळखी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह रविवार दुपारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत वृध्दाची ओळख पटवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केट परिसरात असलेल्या दुकान नंबर-२१ जवळ एका अनोळखी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी १७ मार्च रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनांसाठी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत वृद्धाची ओळख पटवावी, असे आवाहन पोलिसांनी नातेवाईकांना केले आहे.पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहे.

Protected Content