जिल्ह्यात १० ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी होणार

 

 

 

 यावल : प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता संसर्ग आणि  ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन हवेतून शोषून घेऊन ऑक्सिजन निर्मिती करणर्या प्रकल्पांची जिल्ह्यात १० ठिकाणी उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती आज जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ .एन .एस . चव्हाण यांनी  आज येथे दिली

 

येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्यचिकीत्सक एन.  एस . चव्हाण यांनी भेट देवुन कोरोना  संसर्गाच्या पार्श्वभुमीवर तालुका आरोग्य प्रशासनाच्या कार्याचा आढावा घेतला  कोरोनाच्या  वाढत्या संसर्गामुळे प्रशासनास   सर्तक राहुन नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचनाही   त्यांनी दिल्या

 

यावेळी यावलचे तहसीलदार महेश पवार , ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ बी. बी .बारेला, यांच्यासह रुग्णालयातील सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .

 

यावेळी पत्रकारांशी बोलतांना डॉ .एन.एस . चव्हाण यांनी रावेर , फैजपुर , यावल तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेले कोवीड सेन्टर व रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या यासंदर्भात आरोग्य प्रशासनाच्या कार्याचा आढावा  घेतल्याचे सांगितले  जिल्ह्यात दहा  ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची  उभारणी होणार आहे  हवेतुन प्राणवायु शोषून घेऊन ते रुग्णांना पुरवणारे हे प्रकल्प जामनेर , पारोळा, चोपडा ,अमळनेर , चाळीसगाव , मुक्ताईनगर , भुसावळ , रावेर  येथे असतील  डीपीडीसीच्या माध्यमातुन हा खर्च करण्यात येणार आहे .

दोन दिवसात भुसावळच्या प्लांट उभारणीचे काम सुरु होणार असल्याचे डॉ एन एस चव्हाण यांनी सांगीतले .  या प्रकल्पांमधून प्राणवायू पुअरवठा सुरु झाल्यावर  कोरोना रुग्णाची होणारी हेळसांड थांबेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला  . यावेळी यावल ग्रामीण रुग्णालयात लोकसहभागातुन  रुग्णसंख्येच्या आधारावर ऑक्सीजन बेडची  संख्या  वाढवू  असे त्यांनी सांगीतले .

 

Protected Content