रावेर तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यांवर कारवाई

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील जेवणाच्या ढाब्यावर अवैधरित्या दारूविक्री करण्याबाबत लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजने बातमी प्रसिध्द केली होती. या वृत्ताची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुऱ्हाणपुर- अंकलेश्वर महामार्गावरील चार ढाब्यांवर छापा टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

 

बनावट दारूकडे दुर्लक्ष म्हणुन कर्तव्यात कसूरचा ठपका ठेवत यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ४ जणांना जुलै महिन्यात निलंबित केले होते. तरी सुध्दा परिस्थिती जैसे-थे निर्माण झाली होती. रावेर तालुक्यात जेवणाच्या ढाब्यावर अवैध दारू विक्री होत असून निरिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याची बातमी येताच याची दखल घेऊन गुरूवारी रात्री महामार्गला लागून असलेल्या ढाब्यावर कारवाई करण्यात आली आहे. खिर्डी, पाल, चिनावल या परिसरात  देखिल कारवाई करण्याची तत्परता दाखवावी अशी मागणी होत आहे.

 

अवैध दारू प्रकरणी चार ढाब्यांवर कारवाई

यावल-बुऱ्हाणपूर महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दि १४ च्या रात्री कारवाई करण्यात आली यामध्ये चार ढाब्यावर कारवाई करण्यात आली यामध्ये देशी दारू, विदेशी दारू, बियर असे एकूण 9 हजार 120 रूपयांचा उद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.  तर तिन ठिकाणी निरंकाचे पंचनामे करण्यात आल्याची माहीती दुय्यम निरिक्षक श्री. टेंगळे यांनी दिली.

 

 

Protected Content