यावल येथे दिव्यांग बांधवांना ओळखपत्र वितरीत

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या माध्यमातुन आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तालुक्यातील २०० अपंग बांधवांना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्राप्त झालेले ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. 

दरम्यान आज यावल येथील पंचायत समितीच्या दिव्यांग विभागाच्या कार्यालयात पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान आय तडवी व कार्यालयीन अधिक्षक दिव्यांग विभाग मनोज पाटील, कार्यलयाचे प्रमुख डी .एम. भाऊराळे , किशोर सपकाळे भारतीय जनता पक्षाच्या अपंग सेलचे जिल्हा अध्यक्ष अरूण पाटील , लक्ष्मीकांत पाटील , किशोर जावरे ,सुनिल पाटील आदी अपंग बांधव याप्रसंगी उपस्थित होते . यावेळी पंचायत समितीच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने अपंग बांधवांचे स्वागत करण्यात आले .दरम्यान केन्द्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्राप्त झालेल्या सुमारे २०० ओळखपत्रांचे वितरण सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान आय. तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!