पोलीस निरिक्षकपदी आयपीएस आशित कांबळे यांनी स्वीकारला पदभार

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या परिविक्षाधीन जागेवर यावल पोलीस निरिक्षकाचा प्रभारी कार्यभार उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एकरर्गा येथील आशित कांबळे (आयपीएस ) यांनी स्वीकारला आहे.                            

यावल पोलीस स्टेशन येथे १५ महीन्यापासून कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांची विनंतीवरून नाशिक येथे बदली झाली असून त्यांच्या रिक्त झातेल्या ठिकाणी यावलचे पोलीस निरिक्षक म्हणून परिक्षाविधीन (आयपीएस) अधिकारी आशित कांबळे यांनी पदभार स्वीकारला.

यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी बोलतांना सांगीतले की, “आपण आपल्या कार्यक्षेत्रात बेशिस्तपणा, गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या पिक नासाडीचा प्रश्न, वाढलेल्या अवैध धंद्यांचा बिमोड करणार असून ही अवैध धंदे कायमचीच बंद व्हावी असे आपले प्रयत्न राहणार आहे. त्याच बरोबर बेशिस्त झालेल्या शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहकतुकीस शिस्त लावणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.

Protected Content