पुन्हा खुनाने हादरले जळगाव : शिवाजीनगरात तरूणाची हत्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी झालेल्या दोन खुनांनी उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज जळगावात पुन्हा एकदा खून झाला आहे.

जळगावातील खुनांचे प्रमाण वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी तर एकाच दिवशी दोन खून झाल्यामुळे जनमानस सुन्न झाले होते. यानंतर आज पुन्हा एकदा शिवाजीनगर हुडको परिसरात खून झाल्याचे खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर हुडको परिसरातील मोहंमद मुसेफ शेख इसाक ( वय ४०, रा. शिवाजी नगर) यांच्यावर रात्री साडेआठच्या सुमारास चॉपर हल्ला झाला. यात मोहंमद यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोर फरार झाला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे.

Protected Content