Home धर्म-समाज राज ठाकरेंच्या भोंग्याच्या विधानानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

राज ठाकरेंच्या भोंग्याच्या विधानानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

0
56


पुणे – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषण केले होते. त्यात “मशीदवरती भोंगे लावले तर; समोर हनुमान चालीस लावा.’’ असे विधान केले होते. या विधानानंतर पुण्यात मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

राज ठाकरे यांनी मुंबईतील मशिदी आणि मदरशांमध्ये देशविरोधी कृत्ये सुरू असल्याचे सांगत “मशीदवरती भोंगे लावले तर; समोर स्पीकरवर हनुमान चालीस लावा.’’ या आवाहनानंतर काही ठिकाणी मनसेने हनुमान चालीसा लावला. पुण्यातील वॉर्ड क्रमांक ८४ चे शाखाध्यक्ष माजीद अमीन शेख असून त्यांनी राजीनामा दिला आहे.

बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय समोर असताना जात, धर्म या विषयावर भर दिला जात असल्यामुळे मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती माजीद अमीन शेख यांनी आपल्या पत्रात दिली आहे. माजिद शेख यांच्यानंतरर अनेक मनसे मुस्लिम कार्यकर्ते राजनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.


Protected Content

Play sound