थकित कर्जदारांनी एकरक्कमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा

logo 2

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, मर्यादितच्या जळगाव जिल्हा कार्यालयामार्फत विविध योजनेतंर्गत लाभार्थ्यांना व्यवसायाकरीता कर्ज वाटप करण्यात आले आहे. बहुतांश लाभार्थ्यांचा कर्ज परतफेडीचा कालावधी संपला असून कर्ज रक्कम थकीत आहे. अशा लाभार्थ्यांसाठी थकित कर्जाच्या व्याज दरात 2 टक्के सूट देवून कर्जखाते बंद करण्याची एकरकमी परतावा (One Time Settlement) राबविण्यात येत आहे.

अशा लाभार्थ्यांसाठी महामंडळामार्फत एकरकमी परतावा (One Time Settlement) राबविण्यात येत आहे. संपूर्ण थकीत रक्कम भरणाऱ्या लाभार्थ्यांस थकित कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट देण्यात येईल. तरी जिल्ह्यातील थकीत लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, मर्यादित जळगाव कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content