शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना फोनवरून शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी|  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी माहिती अधिकारात मागितलेली माहिती न दिल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना मोबाईलवरून शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आले आहे. यात रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरांना मारहाण करेल, अशी धमकीही देण्यात आली. या प्रकरणी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

डॉ. गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महेंद्र पाटील याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्याकडे माहिती अधिकारात काही माहिती मागितली होती. ती माहिती दिली नसल्याचा राग आल्याने गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता डॉ. विजय गायकवाड यांच्या मोबाईलवर संपर्क साधून शिवीगाळ केली. तसेच रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरांना मारहाण करेल, अशी धमकीही दिली. या प्रकरणी डॉ. गायकवाड यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात महेंद्र पाटील याच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content