वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीसांनी पकडले आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सुचना पथकाला दिली. गुरूवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पथकाने सावखेडा शिवारातील गिरणा नदीजवळ असलेल्या आर्यन पार्क येथे अवैधरित्या वाळूने भरलेले (एमएच १९ पी ४०९७) ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले. ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नव्हता. पोलीसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल भुषण सपकाळे यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक संजय रामदास सपकाळे (वय-५२) रा. रथ चौक, कोळीपेठ, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content