वझरखेडे कार्यकारी सोसायटी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील  वझरखेडे विकासं सहकारी संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी नंद वाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष सभेत चेअरमन म्हणून राजेंद्र निवृत्ती  झांबरे तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र शेनफडू इंगळे यांची निवड करण्यात आली.

या वेळी संस्थेचे नवनिर्वाचीत संचालक जितेंद्र प्रभाकर नेमाडे, राजेंद्र मधुकर ढाके, भागवत सोमा इंगळे, पुष्पाबाई प्रभाकर ढाके, दिलीप प्रभाकर झांबरे,  बहादूर कवरसिंग पाटील, लताबाई सुमेरसिंग पाटील, सुरेश जगन्नाथ निळे,  उमेश साहेबराव पाटील, प्रकाश माधव सुखाडे तर सचिव माधवराव पाटील यांची उपस्थिती होती.

नुतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना पुढील वाटचालीसाठी राज्याचे माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, अॅड.रवींद्र पाटील व जळगांव जे.डी.सी.सी.बँकेच्या माजी अध्यक्षा अॅड. रोहीणीताई खडसे खेवलकर यांनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान गावातील माजी चेअरमन संदिप नत्थु ढाके, सुरेश निवृत्ती नेमाडे,  महेश प्रभाकर नेमाडे, पांडुरंग शेनफडू इंगळे, चेतन गोविंदा भंगाळे, किशोर प्रभाकर ढाके, बळीराम रामदास झांबरे, अशोक चावदस नेमाडे, रवींद्र शंकर नेमाडे यांनी अभिनंदन केले.

 

 

Protected Content