…तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू- बच्चू कडू

अमरावती | केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचा देशभरातून विरोध केला जात आहे. अशातच राज्याचे शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी कृषी विधेयकात शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ आणि याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू ही तरतूद केल्यास अनुपम भाजपमध्ये प्रवेश करू असे प्रतिपादन केले आहे. 

मोदी सरकारनं अलिकडेच आणलेल्या तीन कृषी कायद्यावरून रणकंदन सुरू आहे. पंजाब, हरयाणासह देशातील विविध भागात शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहे. काँग्रेसकडूनही केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांवर टीका केली जात असतानाच राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिलं आहे. “मोदीजी आपली ५६ इंचची छाती असेल, तर शेतकऱ्यांसाठी दोन ओळी कृषी विधयेकात टाका,” असं कडू यांनी म्हटलं आहे. 

कृषी विधेयकात शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ आणि याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं केल्यास आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात  भाजपच्या महिला नेत्या गप्प आहेत. महिला अत्याचार प्रकरणात पक्ष न पाहता महिलांनी पुढे यावं, असं आवाहनही कडू यांनी केलं आहे.

 

Protected Content