ऑक्‍सफर्डची लस येणार तीन महिन्यांत

लंडन – ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस तीन महिन्यांत इंग्लंडमध्ये सर्वांना देण्यात येणार असून इस्टरपूर्वी देशातील सर्वांना ती उपलब्ध झालेली असेल, अशी माहिती आज जाहीर करण्यात आली आहे. 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला या लसीला परवानगी मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. तर काही आरोग्य विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रौढ व्यक्तीस ही लस मिळण्यास आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

लसीची निर्मिती आणि या वाटपाशी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीला परवानगी मिळाल्यानंतर कोणत्या मुलांना वगळायचे, कोणाला द्यायचे पूर्ण कार्यक्रम ठरवण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल.

दरम्यान, या विभागात कोणत्याही औषधाला परवानगी देण्याआधी ऍस्ट्राझेन्का आणि ऑक्‍सफर्डच्या लस येण्यास नेमका कीती वेळ लागेल याचा आढावा युरोपियन मेडिसीन एजन्सीने घेतला. त्यात ऑक्‍सफर्डची लस आघाडीवर असल्याचा निष्कर्ष या यंत्रणेने काढला आहे. या लसीच्या उत्पादनाचे अधिकार पुण्यातील लस उत्पादक कंपनी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाकडे आहे. त्याची भारतात 1600 जणांवर चाचणी घेण्यात येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.