राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या साडेअकरा लाखांच्या उंबरठ्यावर

मुंबई- राज्यात आज १५ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १३ हजार ७०२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण बरे झाले आहेत. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ नमुन्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.२९ टक्के) आले आहेत. राज्यात  २२ लाख  ०९ हजार ६९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २७ हजार ९३९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले. 

राज्यात आज १५ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १३ हजार ७०२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण बरे झाले आहेत.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.६४ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५५ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.