पराभवानंतर कर्णधार विराटकडून साथीदारांना दिलासा

virat 1

 

 

बेंगळुरू वृत्तसंस्था । दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर कोहलीने साथीदारांना दिलासा देत म्हणाला, “सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला जोखीम ही घ्यावीच लागते. जोपर्यंत खेळ सुरू होत नाही, तोपर्यंत काहीही ठरलेलं नसतं. अनुकूल परिस्थितीतून बाहेर पडून खेळण्याची तुमची तयारी असेल तर नाणेफेकीवेळी काय घडलं याची भीती वाटणार नाही.”

आयपीएल कारकीर्दीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं नेतृत्व करणाऱ्या विराटला एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीची वैशिष्ट्ये आणि उणिवा ठाऊक आहेत. तरीही त्याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात संघ पराभूत झाला. त्यानंतर विराटनं त्यावर स्पष्टीकरणही दिलं. संघानं सुरक्षित भावनेतून बाहेर पडून जोखीम पत्करायला हवी. कारण जोखीम घेतल्याशिवाय संघ निर्भय होऊ शकत नाही, असं तो म्हणाला. आपल्याला जोखीम घ्यावीच लागेल. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला जोखीम ही घ्यावीच लागते. जोपर्यंत खेळ सुरू होत नाही, तोपर्यंत काहीही ठरलेलं नसतं. अनुकूल परिस्थितीतून बाहेर पडून खेळण्याची तुमची तयारी असेल तर नाणेफेकीवेळी काय घडलं याची भीती वाटणार नाही. जोखीम पत्करल्याशिवाय संघ नीडर होऊच शकत नाही, असं तो म्हणाला.

Protected Content