शरद पवारांच्या प्रकृतीत शस्त्रक्रियेनंतर सुधारणा– नवाब मलिक

 

मुंबई,वृत्तसंस्था  ।  ब्रीच कँडी रुग्णालयात  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर दुसरी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली  असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

पोटदुखीच्या तक्रारीनंतर मागील महिन्यात पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयातील खडा हे त्यांच्या पोटदुखीचं कारण असल्याचं तपासणीनंतर समोर आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. त्यानंतर ३० मार्च रोजी रात्री पवारांवर एन्डोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ३ एप्रिलला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. मात्र, दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी त्याचवेळी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार काल त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांच्यावर लॅप्रोस्कोपी करण्यात आली. डॉ. बलसारा यांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर पवारांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होत आहे, असं मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

Protected Content