जळगावात ‘युवासंवाद’ कार्यक्रमात मंत्री ना. सामंत यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद (व्हिडिओ)

जळगांव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवा सेना जळगाव महानगरतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात ‘युवा संवाद’ या कार्यक्रमात युवकांच्या शैक्षणिक विषयांवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संवाद साधला.

शनिवार, दि. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह आदी उपस्थित होते. आयोजित युवा संवादावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना मुंबई येथील सुप्रसिद्ध निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आपल्या बहारदार शैलीच्या माध्यमातून ‘युवकांच्या शैक्षणिक प्रश्नांवर’ मुलाखतीद्वारे बोलतं केले.

यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, “कोरोनाचे रूग्ण सध्या राज्यात कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व परिक्षा ह्या ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचे गांर्भीय लक्षात घेवून अभ्यासाला लागावे.” असे आवाहन केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, “उद्योगाच्या दृष्टीकोनातून त्याचप्रमाणे कमवा आणि शिकवा या योजनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे” असे देखील सांगण्यात आले.

यावेळी संवादातून सद्यःस्थितीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील कमालीची संभम्रावस्था आणि त्यातून निर्माण झालेल्या विविध प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी मंत्री सामंत यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यक्रमाला जळगावसह जिल्हाभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी या संवादासाठी उपस्थित होते.

व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/495063332207119

Protected Content